मुंबई: नुकतेच महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. या योजनेवर अनेक राजकीय व्यक्ती टीका करतानाही दिसत आहे. यावर टीका करताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की विधानसभेची निवडणूक दोन-तीन महिन्यावर आली आहे त्यामुळे आता जुमल्यांचा पाऊस पडणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. दरम्यान लाडकी बहीण योजना चांगली आहे मात्र त्यामध्ये अटी शर्ती टाकले आहेत. त्यामध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी अभ्यासपूर्वक काम करण्याची गरज आहे तसेच या योजनेचे स्वागत केलं पाहिजे असंही सुळे म्हणाल्या. त्याच सोबत कृषी खात्यात 118 कोटीचा भ्रष्टाचार झाला असल्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत आम्ही सर्व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कांदा साखर प्रश्न यामुळे शेतकऱ्यांना येत असलेली अडचणी तसेच नव्या प्रकाराची पॉलिसी बनवणे कांदा निर्यात बंदी केली पाहिजे त्याचा जगावर काय परिणाम होतो आहे याबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत त्यांना विचारले असतात यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले पाहिजे असेही सुळे म्हणाल्या.