थांबलेल्या ट्रक मधून डिझेल चोरी करणाऱ्यां टोळीच्या नाशिक गुन्हे शाखेने आवळल्या मुस्क्या

0
23

सिन्नर शिर्डी महामार्गावर शंकर नगर परिसरातील एचपी पेट्रोल पंपावर उभे असलेल्या 12 टायर ट्रकचे डिझेल टॅंक मधून सुमारे 200 लिटर डिझेल व केबिन मधील 35 हजार रुपये रुपये रोख असा एकूण 49 हजार रुपयांच मुद्देमाल चोरीस गेला होता. दिनांक 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या काही दिवसापासून महामार्गावर अशा पद्धतीच्या अनेक चोऱ्या होत होत्या. हे लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी महामार्गावरील नाउघड चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव सुर्वे यांनी वरील गुन्ह्यातील आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत अभिलेखावरील आरोपींची माहिती घेऊन पथकास तपास करण्यासाठी मार्गदर्शन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार विनोद टिळे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील डिझेल चोरी करणारे गुन्हेगार हे शिर्डी सिन्नर रोडवर एका कार मध्ये येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने पाथरे फाटा परिसरात सापळा रचून सिन्नर बाजूकडे येणारी लाल रंगाची महिंद्रा केयूव्ही 100 कार ताब्यात घेऊन सदर कार सोबत असलेली आणखी एक सफेद रंगाची मारुती आर्टिका कार देखील ताब्यात घेण्यात  आली.यातील संशयित इसम नावे 1)रोहन अनिल अभंग वय वर्ष 28 राहणार देवाचा मळा संगमनेर २)वैभव बाबासाहेब सुरवडे, वय वर्ष 25 ,राहणार जामखेड, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर ३) दादासाहेब दिलीप बावचे , वय वर्ष 27,रा- बोंदेगाव, तालुका कोपरगाव ,जिल्हा अहमदनगर यांना ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यांबाबत चौकशी केली  असता त्यांनी त्यांचे साथीदार 4) समाधान देविदास राठोड राहणार कोपरगाव ,जिल्हा अहमदनगर ,5)सचिन देविदास डाने राहणार येवला, तालुका येवला, जिल्हा नाशिक ,हल्ली राहणार शिर्डी यांचे सोबत मिळून सिन्नर डुबेर नाका व मुसळगाव एमआयडीसी परिसरात रात्रीच्या सुमारास रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकांचे डिझेल व रोख रक्कम सुरू केल्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेले वरील आरोपींकडून महिंद्रा केयूव्ही 100 कार क्रमांक एम .एच .04 जीएन 57 77 व मारुती क्रमांक एम. एच .01सी. एच 34 86 तसेच 10 हजार 500रुपये रोख , मोबाईल फोन तसेच बनावट नंबर प्लेट असा एकूण 12 लाख 58 हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपासा कामे सिन्नर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस पथक शोध घेत आहेत. या आरोपींकडून डिझेल चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पो. विनोद टिळे, हेमंत गिलबिले प्रदीप भैरव या पथकाने ही कामगिरी केली.