विजेच्या धक्क्याने चिमुरडीचा मृत्यू

0
24

भंडारा प्रतिनिधी: तिने नुकतेच शाळेत पाऊल ठेवले होते. शाळेच्या गलथानपणामुळे शाळेच्या तिसऱ्याच दिवशी तिला आपल्या जीवाला मुकावे लागेल. याबाबत सविस्तर वृत्त असे की भंडारा जिल्ह्यातील यशस्वी सोपान राऊत वय वर्ष सहा ही विद्यार्थिनी लाखांदूर तालुक्यातील पुयार जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत होती. ती नेहमीप्रमाणे बुधवार दिनांक 3 रोजी दहा वाजता शाळेत आली होती. मात्र तीअचानकपणे स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची माहिती काही विद्यार्थिनींनी शिक्षकांना दिली असता तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत अधिक चौकशी केली असता स्वच्छतागृहात असणाऱ्या ॲल्युमिनियम वायरीमध्ये विद्युत प्रवाह चालू असल्यामुळे तिला विद्युत झटका लागून तिचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. केवळ शाळेच्या गलथानपणामुळे याची मुरडीला आपल्या आपल्या जीवाला मुकावे लागले. सदर प्रकरणास शाळेच्या मुख्याध्यापकांना जबाबदार धरत त्यांचे निलंबन करत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लहान मुले असणाऱ्या शाळेत विद्युत प्रवाह असणारी तार कशी? सदरची तार किती दिवसापासून? याकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित करत गावकऱ्यानी रुग्णालयाच्या बाहेर काही काळ  ठिया आंदोलन करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.