Lalit patil Drugs| गेल्या काही दिवसापासून गाजत असलेले मोठे प्रकरण म्हणजे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण. आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर समजलं जातं मात्र गेल्या काही वर्षापासून पुणे शहराच्या विकासासह पुणे शहरात वाढत चाललेली गुन्हेगारी ह चर्चेचा विषय ठरली आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग रॅकेट देखील सुरू आहे. याच अनुषंगाने ललित पाटील ट्रक प्रकरण चर्चेत येत असतानाच पुणे पोलीस आयुक्तांनी पोलिस कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केलं आहे.
सदर प्रकरणात चौकशी दरम्यान दोषी आढळल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ केला आहे. त्याचसोबत या प्रकरणात ससून रुग्णालयातील कर्मचारी पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे याच प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने 3150 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
ललित पाटील प्रकरणात दोन सरकारी पोलीस कर्मचाऱ्यावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती समोर येत आहे पुणे पोलीस मुख्यालयातील हे दोन सरकारी कर्मचारी काम करत आहेत पोलीस आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी दोघांची नावे असल्याचे समजते .
ललित पाटील हा पळून गेल्याची माहिती ही आदेश वनकर आणि पिराप्पा बनसोडे यांनी उशिरा दिली होती. त्यामुळे ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना अपयश आले होते म्हणून सध्या या दोघांचं सरकारी सेवेतून निलंबन करण्यात आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा येरवडा जेलमध्ये होता. मात्र तो कारागृहात न राहता म्हणून महिने त्याला हवे तेव्हा रुग्णालयात येऊन राहत होता. रुग्णालयातून तो हवे त्यावेळी हॉटेलमध्ये जाताना दिसत होता वयाचेच व्हिडिओ फुटेज पुढे आल्यामुळे पोलीस कर्मचारी व ललित पाटील यांचे भिंग फुटले होते. त्यानंतरच ललित पाटील हा ससून रुग्णालयातून पसार झाला.