नाशिक मध्ये गांजा विकणारी महिला पोलिसांच्या ताब्यात…

0
27

नाशिक (झुंजार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क)गेल्या वर्षभरापासून नाशिक अमली पदार्थांच्या विक्रीमुळे देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच गांजाची विक्री करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. संशयित महिलेची सखोल चौकशी करत झडती घेतली असता तिच्याकडे वीस हजार रुपये किमतीचा अडीच किलो गांजा सापडला. याबाबत नाशिक येथील उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेचे नाव जैरूनिसा हजरत मंसूरी ( 43 रा. गुलाब वाडी ,देवळाली गाव) असे आहे. उपनगर भागात एक महिला गांजाची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली असता  मंगळवार दि 27) रोजी पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिला ताब्यात घेण्यात आले. यावेळी तिच्याकडे 20 हजार रुपये किमतीचा अडीच किलो गांजा , वजन काटा व प्लास्टिक पिशव्या कापडी पिशवीत मिळून आल्या. या प्रकरणाचा सखोल तपास उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे हे करत आहेत.