खासदार राजाभाऊ वाजे यांचे आईच्या स्मरणार्थ दशक्रिया विधी वेळी वृक्षारोपण

0
18

सिन्नर तालुक्याचे जेष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या पत्नी , खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री कै. रोहिणीताई वाजे यांच्या स्मरणार्थ, वाजे परिवाराच्या वतीने, बाराद्वारी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सिन्नर शहरातील जवळपास सर्वच दशक्रिया विधी हे बाराद्वारी या परिसरात संपन्न होत असतात. त्या अनुषंगाने या परिसरात झाडांची भविष्यातील गरज लक्षात घेत, या परिसरात सिन्नर मधील पर्यावरण संवर्धनाचे काम करणाऱ्या वनप्रस्थ फाउंडेशन यांच्यावतीने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. या ठिकाणी वनप्रस्थ फाउंडेशनने वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब, अर्जुन, यासारख्या रोपांची लागवड केलेली असून सिन्नर नगर परिषदेच्या सहकार्याने त्यांचे संगोपन देखील केले जाणार आहे.
नुकतेच सिन्नर तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे, खासदार राजाभाऊ वाजे आणि वाजे परिवारातील सदस्यांच्या वतीने कै .रोहिनीताई वाजे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने, बाराद्वारी परिसरात वड ,पिंपळ, उंबर अशा रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षांच्या माध्यमातून कै. रोहिणीताई यांच्या स्मृती जोपासल्या जाणार असून, या रोपांचे संगोपन वनप्रस्थ फाउंडेशन व सिन्नर नगरपरिषद हे करणार असून यावेळी वाजे परिवाराचे सदस्य आणि वनप्रस्थ फाउंडेशन चे कार्यकर्ते उपस्थित होते.