ते दोघे शेतीतून कमावताय कोट्यावधी

0
14

महाराष्ट्रात शेतीबाबत निराशाजनक अनेक बातम्या येत असतात. शेती परवडत नाही असाही मोठा सूर निघत असतो. मात्र आधुनिकतेची कास धरत अनेक शेतकरी शेती व्यवसाय ही नफ्याचा व्यवसाय असल्याचे सिद्ध करत आहेत. असेच मराठवाड्यातील अनेक शेतकरी नवीन प्रयोग करत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धाराशिवच्या एका शेतकऱ्याने थेट स्वतःची कायमस्वरूपीची नोकरी सोडत शेती करण्याचा निर्णय घेतला. आज हा शेतकरी वर्षाकाठी दीड कोटीचे उत्पन्न कमवत आहे. आधुनिक शेती करत इतर शेतकऱ्यांसमोर त्याने एक आदर्श निर्माण केला आहे.

धाराशिव येथील रहिवासी रामराजे गोरे आणि नागेश गोरे हे टेल्को कंपनीत नोकरीस होते त्यांनी ह नोकरी सोडून मिळालेल्या पैशातून शेती व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय त्यांनी आपल्या स्वकष्टाने यशस्वी ही करून दाखवला. पुण्यातील आपली नोकरी सोडल्यानंतर मिळालेल्या पैशातून त्यांनी विहीर खोदली त्याच सोबत आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. या कामात त्यांचे बंधू नागेश गोरे यांनी त्यांना मदत केली त्यामुळेच या क्षेत्रात दोघांनीही चांगलं यश मिळवलं आहे.

सुरुवातीला दीड एकरात शेतीला सुरुवात 

नोकरी सोडल्यानंतर मिळालेल्या पैशातून दोन्ही भावंडांनी दीड एकर शेतीत हा पैसा गुंतवत शेती करण्यास सुरुवात केली. आता त्यांच्याकडे दीड एकर जमीन ,तीन विहिरी , नऊ एकर द्राक्ष ,तीन एकर डाळिंब सात एकर क्षेत्रात मिरची लागवड आहे. श्रीराम राजे गोरे यांचे शिक्षण केवळ दहावी असून घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांनी प्रसंगी नाला बांधण्याची देखील काम केले आहे.

विहिरी मधूनच सबंध शेतीला पाणी 

या विहिरी मार्फतच संबंध शेताला पाणी पुरवलं जातं या शेतातून दीड कोटीपर्यंत त्यांनी कमाई केली आहे . आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. शेती करण्या अगोदर एक विहीर व त्यानंतर मिळालेल्या उत्पादनातून गरजेनुसार इतर दोन विहिरी खोदल्या. याच वेअरिंगच्या माध्यमातून संपूर्ण शेतीला पाणी देत, त्यांनी शेतीचे नंदनवन फुलवत कोट्यावधी रुपये मिळवले.