पारंपरिक शेती परवडत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आता शेतीत नवनवीन आधुनिक प्रयोग करत आहेत. शेतीतून शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी आता फळबागांकडे वळताना दिसत आहेत. आधुनिक पद्धतीने लागवड करत सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या गेलेल्या फळांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील मोठ्या मागणी वाढत आहे. हेच लक्षात घेऊन अवघ्या तीन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करत निमगावच्या एका शेतकऱ्याचे डाळिंब थेट दुबईच्या मार्केटमध्ये विकले गेले असून यातून त्याला 52 लाखाची कमाई देखील झाली आहे.
डाळिंबाची थेट दुबईत विक्री
निमगाव येथील प्रगतिशील शेतकरी नागनाथ शिंदे व बंडू शिंदे या दोघांनी तीन एकरात केसर जातीच्या डाळिंबाच्या तेराशे रोपाची लागवड केली होती. लागवडीनंतर प्रति एकरला चार ट्रेलर शेणखत घालत संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या या बागेच्या एका झाडापासून वीस किलो डाळिंबाचे उत्पन्न या दोन्ही शेतकऱ्यांनी घेतलं. त्यांच्या एका डाळिंबाचे वजन दोनशे ते चारशे ग्रॅम असल्याने दुबईच्या मार्केटमध्ये ते हातोहात विकले जात आहे.
डाळिंब शेतीतून साधला लखपती होण्याचा मार्ग
या दोन्ही भावांनी यंदा डाळिंब शेतीसाठी गांडूळ खताचा वापर केला. संपूर्णपणे बागेसाठी सेंद्रिय खतांचा वापर करत पाण्याचे उत्तम नियोजन केले. गोगलगाय पासून झाडे वाचवण्यासाठी त्यांनी गांडूळ खताचा वापर केल्याने संरक्षण होण्यासोबत जमिनीची सुपीकता वाढली यामुळे डाळिंबाचा गोडवा तसेच योग्य वजन वाढण्याचे शेतकरी सांगतात. मालाची प्रतवारी उत्तम दर्जाची झाल्याने सदर माल दुबईला निर्यात करता आला.
एकरी खर्च लाखात
या तीन एकर क्षेत्रात डाळिंब लागवडीसाठी या शेतकऱ्यांना 7.5 लाखांचा खर्च आला. यावर्षी त्यांची कमाई 52 लाखाची आहे. तीन एकरात ती स्टण डाळिंबाची निर्यात या शेतकऱ्यांनी करत प्रती एकर अडीच लाख रुपये खर्च आल्याच ते सांगतात. म** उत्तम प्रतीचा असल्याने व्यापारी स्वतःहून त्यांच्याकडे आले व 180 रुपये प्रति किलो दराने डाळिंब खरेदी करून दुबईला निर्यात केल्याचे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. शेतकऱ्यांना तीन एकर जमिनीतून आत्तापर्यंत 30 टन अशा विक्रमी डाळिंबाची दुबईला निर्यात केली आहे.