बसमध्ये चढताना चोरांनी लंपास केली लाखाची रोकड..

0
27

नाशिक: सीबीएस बस स्थानकात बस मध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलेच्या पर्समधील लाखाची रोकड लंपास केली. सटाणा तालुक्यातील जायखेडा येथील शेतकरी जोडपे आपल्या मुलाला भेटण्यासाठी शहरात आले होते. मुलाला भेटून परत जात असताना कांद्याच्या विक्रीतून आलेली रक्कम महिलेच्या पर्समध्ये होती याच रकमेवर चोरट्याने डल्ला मारला. या चोरी प्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासून शेख यांनी याबाबत फिर्याद दिली. वसई नंदुरबार या बस मध्ये चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत तबसूम शेख यांच्या पर्स मधील रकमेवर डल्ला मारला. बस मध्ये बसल्यावर वरची चैन उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. यानंतर या जोडप्याने पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली याबाबत अधिकचा तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.