फटाक्यांच्या गोदामाला आग… आवाजाने परिसरात घबराट

0
27

नाशिक प्रतिनिधी : आज दुपारी शिंदे गाव येथील असणाऱ्या फटाक्याचा गोदामाला भीषण आग लागल. या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून भस्मसात झाले. 

शिंदेगाव येथे अनेक फटाक्यांचे गोडाऊन आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लाखो रुपयांचे फटाके या गोदामात असतात. यापैकीच देवळाली गावातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत शिवलाल विसपुते यांचा मुलगा गौरव विसपुते यांच्या मालकीचे शिंदेगाव नायगाव रोड येथे फटाक्यचे गोडाऊनला  दुपारी बारा वाजेच्या सुमारास अज्ञात कारणाने आग लागली. फटाके असल्याने काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. फटाक्यांच्या आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. या ठिकाणी आठ ते दहा कामगार होते त्यांना बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यातील एक कामगार भाजला असून त्याला पुढील उपचारासाठी नाशिकरोड येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते, अग्निशमन दल तात्काळ पोहोचले. नासिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व पोलीस घटनास्थळी हजर राहून आग आटोक्यात आणण्याचे काम केले.

आगीचा भयानक व्हिडिओ बघा👇