नाशिक बंगळूरु विमान सेवेला सुरुवात.. पहिल्या फेरीत 267 प्रवाशांनी घेतला लाभ

0
23

नाशिकला देशांतर्गत मुख्य शहरांना जोडण्याची मागणी गेल्या अनेक दिवसातून होत होती. यापूर्वी नाशिक- दिल्ली विमानसेवा सुरू आहे, नाशिक- हैदराबाद, नाशिक अहमदाबाद या सेवा पण अखंडितपणे सुरू आहेत. याचप्रमाणे नाशिक-कोलकत्ता ,नाशिक-बंगळुरू सेवा सुरू करण्याची मागणी देखील अनेक दिवसापासून सातत्याने केली जात होती.

याच मागणीचा विचार करून बंगळुरू शहराला जोडणारी नाशिक बंगळूरू ही सेवा सुरू करण्यात आली. सदर विमान बंगळूरू वरून २.३० वाजता निघून नाशिकला ४.२०  मिनिटांनी पोहोचणार आहे तर नाशिक हून सायंकाळी ४.५० वाजता निघून बंगळूरूला ६.३० वाजता पोहोचणार आहे. खूप दिवसापासून उद्योजकांकडून या शहराला जोडण्यासाठी विमान सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. याचे कारण म्हणजे हे शहर औद्योगिकनगरी आहे. अनेक मोठ्या समूहांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कारखाने बंगळूरू येथे असून त्याच्या काही शाखा नासिक येथे देखील आहेत. याचमुळे अनेक दिवसापासून ही मागणी करण्यात येत होती. या मागणीला प्रतिसाद देत इंडिगो कंपनीने नाशिक बंगळुरू सेवेला प्रारंभ केला. पहिल्या दिवशी सुरू झालेल्या सेवेत बंगळुरू वरून नाशिक साठी 189 प्रवाशांनी प्रवास केला तर नाशिकहून बंगळूरूसाठी 178 प्रवाशांनी प्रवास केला. ही सेवा सुरू करण्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठपुराव्याने सुरू झाली आहे. सदरची सेवा सुरू झाल्यामुळे नाशिकच्या उद्योग व पर्यटन क्षेत्राला मोठी संधी निर्माण होणार आहे.