फिरायला गेलेल्या लष्करी जवानाच्या मैत्रिणीवर बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार

0
19

इंदोर: भारतात सध्या अत्याचारांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. अत्याचारांचे हे सत्र सुरूच आहे. नुकत्याच घडलेल्या कोलकत्ता घटनेवर संताप व्यक्त केला जात असतानाच आता इंदोरमध्ये एक भयानक घटना घडली आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारे दोन अधिकारी आपल्या मैत्रिणींसोबत फिरायला गेलेले असताना त्यांच्यावर हल्ला करत बंदुकीचा धाक दाखवत अत्याचार करण्याची घटना इंदोर मध्ये घडली आहे.

इंदोरपासून 50 किलोमीटर दूर असणाऱ्या ऐतिहासिक जाम गेट जवळ मंगळवारी रात्री उशिरा ही भयंकर घटना घडली या हल्ल्यात दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे दोन्ही अधिकारी महुच्या इन्फंट्री स्कूलमध्ये यंग ऑफिसरचा कोर्स करत आहेत. दोन जवान व त्यांच्या दोन मैत्रिणी असे दोघेजण मंगळवारी रात्री मंडलेश्वर रस्त्यावरील जाम गेटजवळील अहिल्या गेटजवळ फिरायला गेले होते. रात्रीच्या अडीच वाजले असताना एक अधिकारी आणि त्याची मैत्रीण कार मध्ये असताना सहा सात जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे समजते. यावेळी बंदुकीचा धाक दाखवत अधिकाऱ्याच्या मैत्रिणीवर अत्याचार केला.

ही घटना घडली त्यावेळी दुसरा जवान मैत्रिणी मैत्रिणी सोबत टेकडीवर होता किंचाळण्याचा आवाज ऐकून तोही खाली आला. हल्लेखोरांनी बंदुक दाखवत दहा लाख रुपयाची मागणी केली. एवढ्या वेळेत दुसऱ्या अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. दरम्यान या चौघांनाही साडेसहा वाजता महू सिविल हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय तपासणीत महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. बर गोंडा पोलीस याबाबतचा पुढील तपास करत आहेत. तसेच सहा संशयीतांची ओळख पटली असून त्यातील चौघांना जंगलातून ताब्यात देखील घेण्यात आले आहे.