मराठा आरक्षणाच्या लढ्यात आज एक वेदनादायक प्रसंग घडला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चात सहभागी असलेल्या एका सहकाऱ्याचा जुन्नर येथे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.
अंतरवली सराटीवरून सुरू झालेला हा मोर्चा आज सकाळी जुन्नरमध्ये पोहोचला. याच दरम्यान दुर्दैवी घटना घडली आणि मोर्चातील सर्वत्र खळबळ उडाली.
याआधीच लातूरमध्ये एका तरुणाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
या सलग घडलेल्या घटनांमुळे समाजात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
🙏 झुंजार महाराष्ट्रतर्फे या सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली.


