कापूस सोयाबीन उत्पादकांना मदतीची घोषणा

0
28

मुंबई प्रतिनिधी: सध्या कापूस व सोयाबीन यांना भाव मिळत नसल्याने याबाबत भाजपचे हरीश पिंपळे व सदस्य यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याला उत्तर देताना पणन मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत ोन हेक्‍टरपर्यंत देईल व या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल. या सबतच सोयाबीन उत्पादकांच्या दृष्टीनेही लवकरच मदत जाहीर केली जाईल. विरोधी पक्षनेते विजय वडेंटीवार , हरिभाऊ बागडे ,नारायण कुचे ,यशोमती ठाकूर ,किशोर जोर गेगवार या सदस्यांनी देखील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. यावर दिवाळीपूर्वीच कापूस खरेदी सुरू करण्यात येईल आखूड धागेच्या कापसाला 7121 रुपये तर लांब धाग्याला 7521 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे भाव दिला जाईल असे सत्तार यांनी सांगितले. जर शेतकऱ्यांना एकरी 20000 रुपये किमान उत्पादन खर्च येतो तर मग शासन देत असलेली 5000 हेक्टरी मदत याने शेतकऱ्यांना काय फायदा होईल असा प्रश्न विजय वडेंटीवार यांनी उपस्थित केला.