Hathras accident:भोले बाबा कोट्यावधी रुपयांच्या फाईव्ह स्टार आश्रमाचा मालक

0
24

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या सत्संगातील दुर्घटनेमुळे(Hathras news) चर्चेत आलेले बाबा नारायण सातार उर्फ भोले बाबा यांच्याबाबत आता विविध खुलासे होत आहेत.

भारतासाठी बाबा आणि त्यांचे संपत्तीचे किस्से हे नवीन नाहीत. आता भोले बाबा यांच्या मालमत्तेबाबतही मोठे खुलासे झाले आहेत. उत्तर प्रदेश मध्ये त्यांचा एक फाईव्ह स्टार आलशान आश्रम असल्याची माहिती समोर आली आहे.

या आश्रमाची किंमत कोटींमध्ये सांगितली जात आहे . याच आश्रमात बाबांचे अनेक दिवस दिवसापासून वास्तव्य असल्याचे सांगितले जात आहे. भोले बाबा यांच्यावर याआधीही अनेक गुणांची नोंद असल्याची माहिती समोर येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बाबांच्या संपत्तीचे काही कागदपत्रेही हाती लागले आहे.

त्यात उत्तर प्रदेशातील मैनपुर येथे बाबांचा 13 एकरात पसरलेला आश्रम असून त्याची किंमत सुमारे चार कोटी रुपये आहे. या आश्रमात अनेक मोठ्या खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये फाईव्ह स्टार प्रमाणे सोयी सुविधा आहेत. या आश्रमात सुरज पाल राहत होते आणि बाकी सहा खोल्या फक्त त्यांच्यासाठीच होत्या. इतर सहा खोल्यांमध्ये सदस्य आणि संस्थेसाठी काम करणारे लोक राहत होते. विशेष म्हणजे या आश्रमात जाण्यासाठी एक खाजगी रस्ता होता आणि त्यात अत्याधुनिक उपहारगृहांचा देखील समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तीन-चार वर्षांपूर्वी आश्रमाची जमीन भेट म्हणून देण्यात आली होती असा दावा बाबांनी केला आहे. इतर मिळालेल्या कागदपत्रानुसार बाबा हे कोट्यावधी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. याच बाबांच्या कार्यक्रमात मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 121 जणांना आपला जीव गमवायला लागला होता यात सात मुलांचा देखील समावेश होता. हा सत्संग पाल यांनीच आयोजित केला होता. सदर सत्संगासाठी केवळ 80 हजार लोकांसाठीच परवानगी देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी अडीच लाख होऊन अधिक लोक कार्यक्रमाला पोहोचले असे पोलिसांचे म्हणणे आहे.

हा पाल बाबा कार्यक्रमाला आपल्या कारमधून परतत असताना माती घेण्यासाठी गर्दी झाली व या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह पाल यांच्या अनेक लोकांनी भाविकांना मागे ढकलण्यास सुरुवात केली त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि जमावाने त्यांना चिडल्यामुळे अनेकांचा त्यात मृत्यू झाला. पाल यांच्यावर आग्रा, इटाव फारुखाबद राजस्थान आधी ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले आहेत.