पनवेल प्रतिनिधी: नासिक शहरात राहणाऱ्या एका तरुणाचे पनवेल येथे वास्तव्यास असलेल्या तरुणी सोबत नऊ वर्ष प्रेम संबंध होते. या काळात तरुणाने तरुणीला लग्नासाठी तयार असल्याचे सांग तिच्यासोबत शारीरिक संबंध ही प्रस्थापित केले. नंतर अचानक पणे लग्नाला नकार देत टाळाटाळ करू लागल्याने मानसिक तणावाखाली आलेल्या तरुणीने राहत्या घरात जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पनवेल पोलिसांनी आरोपी तरुण विजय प्रकाश गोरे वय वर्ष 28 याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- या प्रकरणात तरुण नासिक ओझर येथे तर तरुणी पनवेल येथे राहत.
- या दोघांमध्ये 2016 पासून प्रेमसंबंध सुरू होते.
- संशयित आरोपी विजय गोरे याने तरुणीसोबत अनेकदा शरीर संबंध ही प्रस्थापित केले होते.
- 2020 मध्ये आम्ही दोघे लग्न करणार आहोत असे तरुणीने आपल्या आई-वडिलांना कळविले होते.
- मात्र अचानकपणे विजय याने तरुणीला लग्न करता येत नसल्याचे सांगितल्याने तरुणीने टोकाचा निर्णय घेत जीवनप्रवास संपवला.
या दोघांच्या लग्नाला तरुणीच्या आई-वडिलांचा होकार होता गेल्या नऊ वर्षापासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू असल्याने त्या नंतर मे महिन्यात विजयने आपल्या आई-वडिलांचा या लग्नाला विरोध असल्याचे तसेच इतर दुसऱ्या मुलीसोबत त्याचे लग्न करण्याची तयारी सुरू आहे असे तरुणीला कळविले व लग्नास नकार दिला. यानंतर मृत तरुणी व तिच्या बहिणीने नासिक येथे येऊन विजयास लग्नाला नकाराचे कारण विचारले असतात विविध कारणे सांगून त्याने लग्न स्पष्टपणे नकार दिला होता. त्यानंतर सदर तरुणीने पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात तक्रार देखील केली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी विजय गोरे याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. मात्र तो पोलीस ठाण्यात सुद्धा हजर झाला नव्हता. त्यानंतर मानसिक तणावाखाली गेलेल्या या तरुणीने कामावर जाणे ही बंद केले होते व याच तणावातून तिने घरामध्ये कोणीही नसताना बेडरूम मध्ये गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. सदर तरुणीने जीवन संपण्यापूर्वी आपल्या दोन बहिणींसाठी तसेच विजय गोरे याच्यासाठी तीन चिठ्ठ्य लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात विजय गोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास केला जात आहे.