भरधाव ट्रकच्या धडकेत पोलीस जवान ठार

0
25
गोंदिया
अपघातग्रस्त पोलीस व्हॅन, इनो सेट मध्ये मृत पोलीस.

गोंदिया प्रतिनिधी: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने ट्राफिक पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी तालुक्यांतील मसूलकसा घाटात ही घटना घडली असून या अपघातामध्ये पोलिसांच्या गाडी चक्काचूर झाली आहे.

गोंदिया
अपघातग्रस्त पोलीस व्हॅन, मृत पोलीस.

समजलेल्या माहितीनुसार गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या व्हॅनला अपघात झाला. पोलिसांचे एक पथक देवरी तालुक्यात गस्तीवर होते ,त्याचवेळी हा प्रकार घडला असून देवरे कडून नागपूरच्या दिशेने लोखंडी अँगल घेऊन जाणाऱ्या भरगाव ट्रकने पोलिसांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. ट्रक मधील लोखंडी अँगल पोलिसांच्या गाडीवर कोसळल्याने त्यातील अँगल पोलिसांच्या पोटात घुसल्यामुळे जखमी झाले. त्यातील मनीष बहेलिया या ट्राफिक पोलिसांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश लिल्हारे जखमी झाले. तर गाडीचे चालक योगेश बनोटे यांना किरकोळ इजा झाली. चालकानेच बाकी लोकांना गाडीच्या बाहेर काढत एका खाजगी वाहनाने देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जखमी पोलिसांना गोंदियातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.