महायुतीला धक्का देणारा सर्वे आला समोर…

0
20

Maharashtra poll survey|महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका बाबत वेगवेगळे सर्वे केले जात आहेत तर काही सर्वे झाले असून त्याची माहिती समोर येत आहे. असाच एक सर्वेसमोर आल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची झोप उडाली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी भारतीय जनता पक्ष यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव करू शकतो. म्हणजेच येत्या विधानसभेला महाविकास आघाडी बाजी मारेल असा एक सर्वे समोर आला आहे.

झटका देणारा सर्वे समोर

लोक पोलच्या सर्वेनुसार महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महायुतीला 115 ते 128 जागा मिळू शकतात तर त्यांची मतं 38 ते 41 टक्के असू शकतात. मात्र विरोधात असलेल्या महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा मिळू शकतात तर त्यांची मत 41 ते 44 टक्के इतकी असू शकतात. तर महाराष्ट्रात इतरांना पाच ते 18 जागा मिळू शकतात आणि मतांची टक्केवारी ही 15 ते 18 टक्के असू शकते.

या सर्वेक्षणात नक्की आहे तरी काय? 

या सर्वेत पहिला झोन विदर्भ आहे. या ठिकाणी 62 विधानसभा निवडणुकीच्या जागा आहे. यापैकी महायुतीला 15 ते 20 महाविकास आघाडीला 40 ते 45 व इतरांना एक ते पाच जागा मिळू शकतात. या ठिकाणी लोकांचा कल काँग्रेसच्या बाजूने झुकलेला दिसतो.

दुसरा झोन खानदेश आहे. या ठिकाणी विधानसभेच्या 47 जागा आहेत. यापैकी महायुतीला 20 ते 25 महाविकास आघाडीला 20 ते 25 आणि इतरांना शून्य ते दोन जागा जिंकता येतील. खानदेशातील एसटी पट्टा महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहे.

तिसरा झोन ठाणे कोकण या भागात विधानसभेच्या 39 जागा असून येथे महायुतीला 25 30 जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला पाच ते दहा जागा आणि इतरांना एक ते तीन जागा मिळू शकतात.

चौथा झोन मुंबई आहे या भागात विधानसभेच्या 36 जागा आहेत सत्ताधारी महायुतीला 10 ते 15 महाविकास आघाडीला 20 ते 25 आणि इतरांना शून्य ते एक जागा मिळू शकत असल्याचे या सर्वेत समोर आले आहे. मुंबईत उच्चभ्रू विरुद्ध मध्यमवर्गीय असा निवडणुकीचा मूड असतो. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे मुंबईतील जास्त मराठी मध्ये पहायला मिळतील. तर काँग्रेसला मुस्लिम वॉर्ड बँकेचा फायदा मिळेल. असा सर्वे समोर आला आहे. यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.