झोपमोड केली म्हणून थेट केला वार…

0
15

नाशिक: शहरातील एका नामांकित डीजे मालकाचा ऑपरेटर आपले दैनंदिन काम आटपून घरी जाण्यासाठी आपल्या मालकाचे रिक्षा घेण्यासाठी हिरावाडीतील कमल नगर मध्ये गेला असता रिक्षात झोपलेल्या दोघा जणांना आवाज देत उठविल्याचा राग आल्याने सदर व्यक्तींनी ऑपरेटरला बांबूने मारहाण करत धारदार कोयत्याने डोक्यात वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे.

याबाबत श्री किरण बंडू पगारे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात हल्लेखोरां विरोधात पंचवटी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी साक्षीदारांच्या जबाब नोंदवून घेतले आहेत. पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत.