तैवान पेरूच्या लागवडीतून तो बनला लखपती

0
14

सोलापूर: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन उच्चशिक्षित झालेले तरुण दिसतात. मात्र त्या प्रमाणात नोकरी नसल्यामुळे अलीकडच्या काळात सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र याला महाराष्ट्रातील काही तरुण अपवाद ठरत आहेत. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यावसायिक व शेती करण्याकडे तरुणांचा कल वाढताना दिसत आहे. अशाच एका उच्चशिक्षित जोडप्याने फळबाग शेतीची कास धरली आहे. केवळ दीड एकरावर तैवान पेरूची लागवड करत त्यांनी 24 लाख हून अधक रुपयाची कमाई करून दाखवली आहे. करमाळ्याच्या या सुशिक्षित जोडीने फळबाग लागवडीतून आर्थिक प्रगती साधली असून इतर तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

आधुनिकतेची कास धरत लखपती 

दीड एकरावर पंधराशे पन्नास रोपांची लागवड करत दीड एकरातून 36 टन उत्पादन मिळवले असून त्यांना पेरूच्या लागवडीपासून तर विक्री पर्यंत संपूर्णपणे पाच लाख 50 हजार रुपयांचा खर्च आला . या 36 टनाची विक्री करून त्यांना 24 लाख 20 हजार रुपयांचा फायदा झाला.

पारंपारिक पाणीपद्धतीला छेद देत ठिबक सिंचनाने पुरवलं पाणी 

करमाळा येथील वाशिंबे गावची हे सुशिक्षित जोडी आहे उच्चशिक्षित शेतकरी विजय जगदाळे आणि त्यांची पत्नी प्रियंका जगदाळ यांनी मार्च 2023 मध्ये या फळबागेची लागवड केली. या बागेला त्यांनी देशी गायीच्या शेणासह सेंद्रिय खतांचा वापर केला. या फळबागेला पारंपारिक पद्धतीने पाणी न देता ठिबकच्या साह्याने पाणीपुरवठा केला.