नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस आक्रमक.. आंदोलन करत नोंदवला निषेध

0
20

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे सबंध महाराष्ट्रभर शिवप्रेमी मध्ये संतापाची लाट आहे. या घटनेचा निषेध म्हणून नाशिक जिल्हा ग्रामीण युवा काँग्रेस व सर्व शिवप्रेमींच्या वतीने नाशिक सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सर्व नागरिकांना शपथ देण्यात आली व त्यानंतर पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या घटनेबाबत सरकारचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याचे अपयश हे सरकार नौदलाच्या माथी मारत असल्याचा आरोप  काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसने अनुभव नसलेला शिल्पकाराला काम कसे?, राज्य सरकारचे कला संचनालय काय करत होते ? असे प्रश्न उपस्थित केले. यावेळी जेष्ठ नेते शाहू महाराज खैरे,जेष्ठ नेते सुरेश मारू,ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद(अण्णा)लभडे,जिल्हा सरचिटणीस पंकज सोनवणे,देवेन मारू,शिवप्रेमी नितीन रोटे पाटील,शिवप्रेमी प्रफुल्ल वाघ,प्रशांत गांगुर्डे,प्रवीण काटे,शिवप्रेमी अनिल आहेर,मीडिया जिल्हाध्यक्ष देवेन मारू,युवक प्रवक्ते महेश देवरे ,शिवप्रेमी निलेश गायकवाड,शिवप्रेमी विक्रम गायधनी,शिवप्रेमी निलेश ठुबे, सागर पिंपळके,रामेश्वर भोये,रवींद्र गावित,जयवंत चौधरी,चेतन बंगाळ,अण्णा मोरे,सोमनाथ मोहिते,संजय विभूते आदी उपस्थित होते.