महाराष्ट्रातील मेंढी पालन व्यवसायाला चालना देत व्यवसाय वृद्धी होण्यासाठी राज्यातील भटकंती करणाऱ्या भटक्या जमाती समाजामधील पशुपालकांना बळ देणाऱ्या यशवंतराव होळकर महामेष योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने अनुदान योजनेला मान्यता दिली असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
या महामेष योजनेचा फायदा धनगर आणि तस्सम समाजातील लोकांना होणार आहे. सदर अनुदान योजनेतून मिळण्यासाठी चराई अनुदान ,मेंढी शेळीपालनासाठी जागा खरेदी अनुदान, त्यासोबत कुकुट पक्षांच्या खरेदी आणि संगोपनासाठी देखील अनुदान दिले जाणार आहे. सदर योजनेसाठी 12 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. यशवंतराव होळकर महामेष योजनेमध्ये स्थायी, स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालन करणाऱ्यांसाठी मूलभूत पायाभूत सोयी सुविधासह 20 मेंढ्या व 1 मेंढानर अशा मेंढी गटासाठी 75 %अनुदान वाटप करण्यात येणार आहे, सुधारित प्रजातींसाठी ही 75 % अनुदान तसेच मेंढीपालनासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करण्यासाठीही 75% अनुदान देण्यात येणार आहे.
यासोबत संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75 % अनुदान हिरव्या सार्याच्या मुरघास गासड्या बांधण्याचे यंत्र खरेदी करण्यासाठी 50%, पशुखाद्य कारखाना उभारणीसाठी 50% अनुदान इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. मेंढ्यांच्या चराई अनुदान या योजनेमध्ये ज्या मेंढी पालन करणाऱ्या कुटुंबांकडे किमान 20 मेंढ्या व एक मेंढा नर एवढे पशुधन आहे अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमहा रू 6000हजार रुपये असे एकूण 24 हजार रुपये चराई अनुदान देखील वाटप करण्यात येणार आहे .
या सोबतच जागा खरेदी अनुदान योजनेमध्ये भूमिहीन मेंडपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्धबंदिस्त बंदिस्त मेंढी पालन करण्याकरता किमान खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या 75 टक्के (अधिकतम 50 हजार) अथवा किमान 30 वर्षासाठी भाडे करारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या 75 % रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल 50 हजार रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे.
यासोबत कुकुट पक्षांची खरेदी करण्यासाठी त्यासोबतच संगोपनासाठी अनुदान या योजनेमध्ये चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या शंभर पक्षांच्या खरेदी आणि संगोपनासाठी रुपये 9000 रुपये मर्यादित 75 % अनुदान या बाबीचा देखील समावेश करण्यात आला आहे
अर्ज भरण्यासाठी खालील संकेतस्थळावर भेट द्या.
http://सदर योजनेचे अर्ज ”www.mahamesh.org” या संकेतस्थळावर (website) उपलब्ध