मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला पुतळा आठ महिने २२ दिवसात कोसळतो ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून आमच्या देवतांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही या घटनेमुळे शिवप्रेमी मध्ये तीव्र संताप आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी एक मोठा दावा केला आहे. बदलापूरचे प्रकरण दाबण्यासाठी शिवरायांचा पुतळा पाडला असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सगळ्यांनी मिळून बदलापूर प्रकरण संपवलं. हा पुतळा पडला नसून पाडलाच आहे. कोकणातील कमी उंचीच्या दोन-तीन लोकांनी मुंबईतील बॉसला खुश करण्यासाठी हा खेळ केला. या आडून बदलापूर प्रकरण संपवले. असा आरोप केदार यांनी केला आहे.
केदार यांच्या या विधानानंतर शिवप्रेमी कडून याबाबत चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे.