पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही व्हाल करोडपती.. बघा कोणती ….

0
32

समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याची चिंता लागून असते त्यासाठी तो आपल्या रोजच्या कमाईचा एक हिस्सा भविष्यासाठी बाजूला काढून ठेवत असतो. जेणेकरून अडीअडचणीच्या काळात तीच रक्कम कामी येईल. परंतु ही बाजूला काढलेल्या रकमेची गुंतवणूक नेमकी कुठे करावी, त्याचा परतावा जास्त असेल की नाही ? याबाबत अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतात.त्यासोबत बाजारातही गुंतवणुकीचे अनेक पर्याय देखील उपलब्ध असतात मात्र सुरक्षेची खात्री तसेच भरघोस परतावा मिळेल की नाही याबाबत शंकाच असते. त्यामुळेच आम्ही आता आपणाला सरकारच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत की जी तुम्हाला करोडपती बनवेल. आम्ही आपणाला पोस्ट ऑफिसच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत ,जी तुम्हाला विश्वासाची हमीही देईल. त्यासोबत ही योजना सरकारी असल्यामुळे जोखीम नाही ,त्यामुळे तुम्ही गुंतवलेले पैसे हे सुरक्षित राहतील.प

ब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना

या सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करायचे असतील तर तुम्हाला पोस्ट ऑफिस ची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पंधरा वर्षाच्या कार्यकाळातील ही योजना प्रत्येक सामान्य माणसाला करोडपती बनू शकते.

पब्लिक प्रायव्हेट फंड योजनेतील गुंतवणुकीवर सध्या 7.1% व्याज दिले जात आहे. हे व्याज कमी जास्त होऊ शकते.यासोबत पोस्ट ऑफिस योजनेमध्ये टॅक्स चे फायदे मिळतात. कोणतीही व्यक्ती पीपीएफ मध्ये वार्षिक कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकते किंवा किमान ठेव मर्यादा वार्षिक 500 रुपये आहे.
ही योजना पूर्ण होण्याचा कालावधी पंधरा वर्षाचा असला, तरी तुम्ही ही पाच वर्षाच्या ब्लॉकमध्ये देखील वाढवू शकतात. म्हणजेच किमान 25 वर्षासाठी वार्षिक   1.5(उदा 12500 प्रतीमाह  प्रमाणे)लाख रुपये जमा करावे लागतील. एकूण 25 वर्षात तुम्ही एकूण 37 लाख 50 हजार रुपये या योजनेत गुंतवाल तर 7.1% व्याजदरानुसार तुम्हाला 65,58,015रुपये व्याज मिळेल.
तुमची गुंतवणूक आणि त्यावर मिळालेल्या व्याजाच्या रकमेसह 25 वर्षानंतर तुम्हाला 1,03,08,015 रुपये मिळतील. तुम्ही याबाबत याचा कालावधी यापेक्षा अधिक वाढवू शकतात म्हणजेच तीस वर्षे योगदान दिले तर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम म्हणून 1,54,50,911रू मिळू शकतात. अशा रीतीने आपण या योजनेत पैसे गुंतविल्यास आपली रक्कम सुरक्षित राहण्यास सोबतच कोट्याधीश बनण्याची नामी संधी सर्वसामान्यांसाठी चालून आलेली आहे.